पंचवटीत गणरायाचे जल्लोषात स्वागत

By Admin | Updated: September 6, 2016 01:14 IST2016-09-06T01:13:47+5:302016-09-06T01:14:20+5:30

ढोल-ताशांचा गजर : विधिवत प्रतिष्ठापना

Welcoming the celebration of Ganataya in Panchavati | पंचवटीत गणरायाचे जल्लोषात स्वागत

पंचवटीत गणरायाचे जल्लोषात स्वागत

 पंचवटी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत पंचवटी परिसरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करून
विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणरायाच्या स्वागतासाठी घराघरात तसेच मंडळांचे कार्यकर्ते रविवारी सकाळपासूनच सज्ज झाले होते. गणपती प्रतिष्ठापना विधिसाठी लागणारे पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी शेकडो भाविकांनी बाजारपेठत गर्दी केल्याने बाजारपेठही भाविकांच्या गर्दीने तुडूंब भरली होती. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी बच्चे कंपनीही सकाळपासूनच धावपळ करत होते. प्रतिष्ठापना करण्यासाठी कोणी लाडक्या गणरायाला हातात, कोणी चारचाकी वाहनावर ठेवून ढोल- ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत घराकडे तसेच सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी नेत होते.
विघ्नहर्ता गणरायाला घरी आणल्यानंतर कोणी फटाके फोडत तर काहींनी ढोल-ताशांचा गजर करत गणरायाचे स्वागत केले. ठरलेल्या मुहूर्तावर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे गणपतीची आरती करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर गणरायाला मोदक व खिरापतीचा नैवेद्य दाखिवण्यात आला. पंचवटी परिसरातील जवळपास शंभरहून अधिक छोट्या मोठ्या मित्रमंडळांनी व घरगुती गणपती बसविणाऱ्यांनी बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना केली. पंचवटी परिसरातील गजानन चौक मित्रमंडळ, सेवाकुंज येथील सप्तशृंगी मित्रमंडळ, सत्यबाल मित्रमंडळ, सरदारचौक मित्रमंडळ, मखमलाबाद नाक्यावरील कैलास मित्रमंडळ, शिवाजी चौकातील भगवती कला, क्र ीडामंडळ, पेठरोडचे शिवनेरी फ्रेंड सर्कल, नवीन आडगाव नाका मित्रमंडळ, नागचौक मित्रमंडळ, तारवालानगर मित्रमंडळ, शंभुराजे फ्रेंड सर्कल आदिंसह पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, पेठरोड, आरटीओ परिसर, मालेगाव स्टँड, म्हसरूळ, मखमलाबाद, नांदूर, मानूर, पंचवटी गावठाण, हिरावाडी, अमृतधाम, साईनगर, हनुमाननगर, भागातील सार्वजनिक मित्रमंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. (वार्ताहर)

Web Title: Welcoming the celebration of Ganataya in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.