नाशिकरोडला प्रथमच निघणार स्वागत यात्रा
By Admin | Updated: April 5, 2016 22:45 IST2016-04-05T22:44:44+5:302016-04-05T22:45:26+5:30
नाशिकरोडला प्रथमच निघणार स्वागत यात्रा

नाशिकरोडला प्रथमच निघणार स्वागत यात्रा
नाशिकरोड : हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी नाशिकरोड व जेलरोड येथे ‘ब्रह्मध्वज’ संस्थेतर्फे धार्मिक व सांस्कृतिक पद्धतीने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे.गुढीपाडव्याला शुक्रवारी सकाळी ७ वाजता देवळालीगाव लिंगायत कॉलनी समाजमंदिर येथून नववर्ष स्वागतयात्रेस प्रारंभ होईल. शोभायात्रा गाडेकर मळा, दत्तमंदिर रोड मनपा शाळा क्रमांक १२५, आनंदनगर जगताप मळा, जलतरण तलाव, गायखे कॉलनी, दत्तमंदिर सिग्नल, मोटवानी रोड, उत्सव मंगल कार्यालयामार्गे पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या मैदानावर समारोप होईल, तर जेलरोड ज्ञानेश्वरनगर येथून नववर्ष स्वागतयात्रेस प्रारंभ होऊन इंगळेनगर, महाजन हॉस्पिटल, साने गुरुजीनगर, गंधर्वनगरी, उत्सव हॉल येथून पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या मैदानावर समारोप
होईल.
स्वागतयात्रेस लेजीम, झांज, ढोल पथक, चित्ररथ, घोडेस्वार, राष्ट्रपरुषांच्या वेशभूषेतील युवक, बैलगाडी आदि सहभागी होणार असून, शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत करण्यात येणार आहे. शोभायात्रेत नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा प्रमुख अक्षय एडके, नामदेव आढाव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)