एकता रॅलीचे येवल्यात स्वागत
By Admin | Updated: November 9, 2016 23:58 IST2016-11-10T00:01:32+5:302016-11-09T23:58:07+5:30
एकता रॅलीचे येवल्यात स्वागत

एकता रॅलीचे येवल्यात स्वागत
येवला : भन्ते भदन्त धम्मसेन यांच्या नेतृत्वाखाली देशराज मघाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेली नागपूर येथील दीक्षाभूमी ते दादर येथील चैत्यभूमी एकता रॅलीचे मंगळवारी येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील धूळगाव येथे सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा घेण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे होते. यावेळी भगवान बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी भदन्त धम्मसेन यांनी आपल्या प्रबोधनात सांगितले की, बुद्ध धम्म हा दुधासारखा स्वच्छ व सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व रिपब्लिकन पक्ष दिला, तो स्वहितासाठी नसून बहुजनांच्या कल्याणासाठी आहे. परंतु स्वार्थी पुढाऱ्यांनी आंबेडकरी चळवळ आपल्या आवतीभवती फिरवत पोट भरण्याचे काम करत आहे. अशा लोकांना बाजूला करून सामाजिक एकता जपा व डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नाला बुद्ध धम्म व रिपब्लिकन पक्ष मजबुत करा असे आवाहनही भन्तेंनी केले.
यावेळी शशिकांत जगताप, महेंद्र पगारे, देशराज मघाळे यांचीही भाषणे झाली. सुत्रसंचालन तुळशिराम जगताप यांनी केले. आभार सागर गायकवाड यांनी मानले.
यावेळी विजय घोडेराव, आकाश घोडेराव, संजय आहिरे, साहेबराव गायकवाड, पोपट गायकवाड, संतोष गायकवाड, भरत गायकवाड, संजीवनी गायकवाड, सुनीता गायकवाड, अज्वल गायकवाड, ताईबाई जगताप, मिना गायकवाड, शोभा मांजरे, कमल मांजरे, लंकाबाई गायकवाड, सोनाली गायकवाड आदिंसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)