स्वामी समर्थांच्या पालखीचे निफाड येथे सवाद्य स्वागत
By Admin | Updated: May 20, 2016 00:25 IST2016-05-19T23:10:01+5:302016-05-20T00:25:23+5:30
स्वामी समर्थांच्या पालखीचे निफाड येथे सवाद्य स्वागत

स्वामी समर्थांच्या पालखीचे निफाड येथे सवाद्य स्वागत
निफाड : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या गजरात निफाड शहरात अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी परिक्र मेचे स्वागत झाले. अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे निफाड शहरात अतिशय भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
शांतीनगर देवी मंदिरात पालखी आल्यानंतर समर्थ सेवेकरी व निफाडकर नागरिकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. सरकारी वकील व्ही. एन. हाडपे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ पालखीची निफाड शहरातून मिरवणूक काढण्यात
आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील परिवाराने अभिषेक केल्यानंतर पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी वि. दा. व्यवहारे, विजय पाटील, सुनील शर्मा, सुनील राठी, पांडुरंग कर्डिले, विलास कापसे, नाना सानप, रवींद्र पाटील, रवींद्र साळुंखे, सुरेश कुंदे, नीलकंठ कुंदे, रामराव कुंदे, छोटू कुंदे, रवींद्र कुंदे, बापू शिंदे आदिंसह सेवेकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. (वार्ताहर)