दिंडोरीत शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित बालकांचे स्वागत

By Admin | Updated: June 18, 2014 01:18 IST2014-06-17T22:42:52+5:302014-06-18T01:18:44+5:30

दिंडोरीत शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित बालकांचे स्वागत

Welcome to newborns on the first day of school in Dindori | दिंडोरीत शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित बालकांचे स्वागत

दिंडोरीत शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित बालकांचे स्वागत

 

दिंडोरी : राज्यात १६ जून रोजी सर्वत्र एकाच दिवशी शाळा सुरु झाल्या असून, येत्या २०१४-१५ या शैक्षणकि वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे वाजत गाजत सर्वत्र स्वागत करण्यात आले.
दिंडोरी येथील मविप्र संस्थेच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वर्गाची सजावट करण्यात आली होती. छोटी बालके आनंदी दिसत होती. याप्रसंगी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य पी. एन नाठे, शालेय समिती सदस्य गुलाबतात्या जाधव, आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक डी. बी. ढिकले, श्रीमती. व्ही. एन. निरगुडे, एस. एस. गटकळ, आकांक्षा अरगडे आदि उपस्थित होते.

Web Title: Welcome to newborns on the first day of school in Dindori