सुकेणेत महालक्ष्मीचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 02:42 IST2020-08-26T22:11:08+5:302020-08-27T02:42:10+5:30
कसबे सुकेणे : महालक्ष्मी जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी कसबे सुकेणे शहरात घरोघरी आगमन झाले असून उत्साहपूर्ण वातावरणात आणि मांगल्यपूर्ण पद्धतीने स्थापना करण्यात आली आहे. गौरीच्या आगमनामुळे महिला वर्गात उत्साह संचारला असून गुरु वारी (दि.२७) विसर्जन होणार आहे.

सुकेणेत महालक्ष्मीचे जल्लोषात स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : महालक्ष्मी जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी कसबे सुकेणे शहरात घरोघरी आगमन झाले असून उत्साहपूर्ण वातावरणात आणि मांगल्यपूर्ण पद्धतीने स्थापना करण्यात आली आहे. गौरीच्या आगमनामुळे महिला वर्गात उत्साह संचारला असून गुरु वारी (दि.२७) विसर्जन होणार आहे.
गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौराईच्या स्वागताची कसबे सुकेणे शहरात जय्यत तयारी होती. क्र ांती चौक, शिंपी गल्ली, कासार गल्ली, सावरकर चौक, सराफ बाजार आदी भागातील बहुतांश घरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे.
गोड पदार्थ, पुरणपोळी नैवेद्य, आरास, विद्युत रोषणाई, दागिने आदी सजावटीमुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. मंगळवारी गौरींचे आगमन झाले तर बुधवारी भोजन झाले. सणांच्या या धार्मिक वातावरणामुळे भाविकांत जल्लोष पाहावयास मिळत आहे.
(फोटो २६ कसबे सुकेणे)
कसबे सुकेणे शहरातील सावरकर चौकातील सुरेखा औसरकर यांनी स्थापन केलेली महालक्ष्मी पुजन.