धनगर समाजातर्फे जागर रथयात्रेचे स्वागत
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T23:57:34+5:302016-05-17T23:57:37+5:30
धनगर समाजातर्फे जागर रथयात्रेचे स्वागत

धनगर समाजातर्फे जागर रथयात्रेचे स्वागत
नाशिकरोड : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या जागर रथयात्रेचे नाशिकरोड येथील दुर्गा उद्यान येथे स्वागत करण्यात येऊन राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जाती-जमातीच्या सवलतीची त्वरित अंमलबजावणी करावी, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स या संस्थेची धनगर अभ्यासाठी नेमणूक रद्द करा, ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, शेळी-मेंढी विकास महामंडळाला एक हजार कोटीचे पॅकेज देण्यात यावे, मेंढपाळाच्या संरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावे, शेळी-मेंढ्यांसाठी चरावू कुरणे वनखात्याने खुली करावी आदि मागण्यांसाठी डॉ. शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली जागरण रथयात्रा आंबेडकर जयंतीला सांगली आरेवाडी येथील विरोबा मंदिरापासून काढण्यात आली. ४८ दिवस राज्यात विविध ठिकाणी जाणाऱ्या या जागर रथयात्रेचा समारोप ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मदिनी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे होणार आहे. रथयात्रेसोबत महेश शिनगारे, माउली वाघमोडे, संजय रूपणवर, संकेत वाघमोडे, संतोष तरंगे, अनिल चितकर आहेत. रथयात्रेच्या स्वागताप्रसंगी आप्पा माने, श्रावण लांडे, नवनाथ ढगे, सुरेश कळम, नितीन धानापुणे, रामदास रहाटळ, रामदास भांड, शशिकांत वाघ, शिरीषकुमार चव्हाण, प्राजक्ता पाटील, शंकर औशिकर, प्रकाश लांडे, मयूर भगत, चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी