नांदगाव येथे स्वस्थ भारत यात्रा स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 06:07 PM2018-12-18T18:07:34+5:302018-12-18T18:08:32+5:30

नांदगाव : येथे स्वस्थ भारत यात्रा जनजागृती अभियान अखिल भारतीय सायकल रॅलीचे स्वागत आतिषबाजी व औक्षण करून करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभाग, मेडिकल असोसिएशन, राणा असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

Welcome a healthy India visit at Nandgaon | नांदगाव येथे स्वस्थ भारत यात्रा स्वागत

नांदगाव येथे स्वस्थ भारत यात्रा स्वागत

Next
ठळक मुद्दे आपले शरीर निरोगी रहावे, स्वस्थ रहावे यासाठी रॅलीतून संदेश

नांदगाव : येथे स्वस्थ भारत यात्रा जनजागृती अभियान अखिल भारतीय सायकल रॅलीचे स्वागत आतिषबाजी व औक्षण करून करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभाग, मेडिकल असोसिएशन, राणा असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्र मासाठी मंचावर स्वस्थ भारत अन्न औषध प्रशासन सह आयुक्त सि. डी. साळुंके, एम. एन. चौधरी, सी. डी. राठोड, प्रमोद पाटील, अन्न व सुरक्षा अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल भवारी, राजेश कवडे, चांदणी खरोटे, आकाश कलंत्री, बाळासाहेब कवडे आदी व्यासपिठशवर उपस्थित होते.
औरंगाबाद येथून ३५ सायकलस्वारांनी यात सहभाग नोंदवला आहे. आपले शरीर निरोगी रहावे, स्वस्थ रहावे यासाठी रॅलीतून संदेश दिला जात आहे. सायकलस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
ही रॅली औरंगाबाद येथून मालेगावकडे जात आहे. या कार्यक्र मासाठी व्यापारी संघटना अध्यक्ष प्रकाश कलंत्री, उपाध्यक्ष बाळासाहेब कवडे, किराणा असोसिएशनचे बाळू पांडे, महावीर पांडे, ज्योतिप्रसाद अग्रवाल व हॉटेल किराणा इत्यादी व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Welcome a healthy India visit at Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.