ज्ञानमती महाराजांचे जल्लोषात स्वागत
By Admin | Updated: April 29, 2017 02:31 IST2017-04-29T02:31:03+5:302017-04-29T02:31:17+5:30
नाशिक : हर मॉँ की बेटी कैसी हो, मॉँ ज्ञानमतीजी जैसी हो, अशा घोषणा देत म्हसरूळ येथे ज्ञानमती माताजींचे भव्य स्वागत करण्यात आले

ज्ञानमती महाराजांचे जल्लोषात स्वागत
नाशिक : हर मॉँ की बेटी कैसी हो, मॉँ ज्ञानमतीजी जैसी हो, अशा घोषणा देत म्हसरूळ येथे ज्ञानमती माताजींचे भव्य स्वागत करण्यात आले. मांगीतुंगी येथे १०८ फूट उंच भगवान ऋषभदेवाच्या मूर्तीचे निर्माण करणाऱ्या ज्ञानमती माताजी या तब्बल बावन्न वर्षांनंतर नाशिकमध्ये साधू-संतांसमवेत दाखल झाल्या असून, शनिवारी (दि. २९) त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी दिंडोरी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांचे आगमन झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरु ण पवार, सुवर्णा काले आदींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ढोलच्या तालात, कलशधारी महिला, आदिवासी नृत्य व घोषणा देत स्वागत यात्रा काढण्यात आली.
या यात्रेचा समारोप श्री दिगंबर जैन मंदिर म्हसरूळ येथे झाला.
यावेळी भगवंतांचा अभिषेक झाला. त्यानंतर ज्ञानमती माताजी यांनी प्रवचनात अक्षय्यतृतीयेचे जैन
धर्मीयात गजपंथ पहाडाचे
असलेले महत्त्वही त्यांनी सांगितले. माताजी १९६२ मध्ये नाशिक येथे आल्या होत्या, त्यावेळेसच्या आठवणीही सांगितल्या. सायंकाळी आरती आणि सांस्कृतिक कार्यक्र म झाले.
शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमास विजय कासलीवाल, राजाभाऊ पाटणी, जयचंद पाटणी, अशोक पाटणी, धन्नालाल दगडे, प्रकाश झांझरी, मंजूषा पहाडे, संतोष झांझरी, विजय लोहाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)