दिंडोरी तालुक्यात गणरायाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 19:05 IST2018-09-13T19:05:29+5:302018-09-13T19:05:51+5:30
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या गजरात दिंडोरी शहरासह तालुक्यातील घराघरात गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.

दिंडोरी तालुक्यात गणरायाचे स्वागत
विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी अवघी दिंझेरी नगरी सज्ज झाली होती.गणेश मूर्ती, आरास, नैवेद्य, साहित्य आदींच्या दुकानांनी बाजारपेठ गजबजली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी शहरातील व तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंङळांनी व घरगुती गणेश भक्तांनी सकाळपासूनच बाजारात गर्दी केली होती. तसेच ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत धुमधझक्यात बाप्पाच्या मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया..गजरात सार्वजनिक मंङळांसह घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी व मूर्ती घेण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती. नैवेद्यासाठी लागणाऱ्या २१ भाज्या व शोभेच्या वस्तू खरेदी करताना भाविक दिसत होते.यावेळी भाविक भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता . दिंडोरी शहरात गणेशोत्सव मंङळांनी व घरगुती गणेश भक्तांनी उत्साहात गणरायाचे स्वागत केले.