कोरोनावर मात करून आलेल्या दापंत्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:10 IST2020-07-02T18:07:19+5:302020-07-02T18:10:22+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद येथील दांपत्य कोरोनावर मात करून आल्याने त्यांचे वारकरी सांप्रदायाच्या वतीने पुष्पहार घालुन मारूती मंदिरा समोर त्यांचे स्वागत करण्यात आले.

Welcome to the couple who overcame Corona | कोरोनावर मात करून आलेल्या दापंत्याचे स्वागत

कोरोनावर मात करून आलेल्या दापंत्याचे स्वागत

ठळक मुद्देशासकिय यंत्रणा हादरून गेली असून लगेच कामालाही लागली

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद येथील दांपत्य कोरोनावर मात करून आल्याने त्यांचे वारकरी सांप्रदायाच्या वतीने पुष्पहार घालुन मारूती मंदिरा समोर त्यांचे स्वागत करण्यात आले.
दि. १९ जून रोजी गावात पती-पत्नी दांपत्य कोरोना बाधित सापडल्याने सर्व शासकिय यंत्रणा हादरून गेली असून लगेच कामालाही लागली आहे.
सर्व कर्मचारी वर्गाने गावात, शेतात जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली. ग्रामपंचायतीने हजारो रूपये खर्च करून साहित्य खरेदी केले. तसेच या दाम्पत्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन अनेकांच्या कोरोना चाचण्या केल्या त्या सर्वच निगेटिव्ह आल्याने सर्वांनाच समाधान व्यक्त केले. पण या काळात ग्रामपंचायतने कड़क भुमिका घेऊन प्रसंगी नियम मोडणारांना दंडही केला, अधिक खबरदारी म्हणून चौदा दिवस कडकडीत लॉकडाऊन केले. तीन गेटवर दररोज शिक्षकांच्या ड्युटी लावून गाव कोरोना मुक्त केल.े ग्रामस्थ तसेच व्यावसायिकांनी या सर्वांनी सहकार्य केले.
सदर दांपत्य कोरोना मुक्त होऊन सुखरु प घरी आल्याने आषाढी एकादिशी दिनी त्यांचे रतन बांबळे, निवृत्तीबुवा पाटील, रगतवान, दत्तोबा बांबळे, सुरेश मुतडक, प्रल्हाद कोरडे आदींनी या दांम्पत्याचे पुष्पहार घालून स्वागत केले.
प्रतिक्रि या...लॉकडाऊन काळात सर्व आरोग्य, शासकिय व ग्रामपंचात कर्मचारी, सरपंच, सर्व सदस्य, अंगणवाडी तसेच आशा सेविका यांनी खुप मेहनत घेतली व गाव कोरोना मुक्त केले. या पुढेही सर्वांनीच सोशल डिस्टंनशिंग पाळणे प्रत्येकाणे गावात मास्क वापरणे जरूरीचे आहे. या बाबत विनंती करून ही कुणी ऐकणार नसेल तर त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- रामचंद्र परदेशी, उपसरपंच सर्वतीर्थ टाकेद.
 

Web Title: Welcome to the couple who overcame Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.