शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राजधानी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:45 AM

मुंबई ते दिल्ली निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे शनिवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकांत ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देनाशिकरोड : ढोल-ताशांचा गजर; दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची होणार सोय

नाशिकरोड : मुंबई ते दिल्ली निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे शनिवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकांत ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.मध्य रेल्वेच्या मार्गावरून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी व काळाची गरज लक्षात घेऊन मुंबई सीएसटी ते दिल्ली हजरत निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गावरून आठवड्यातून दर बुधवारी व शनिवारी जाणारी राजधानी एक्स्प्रेस शनिवारपासून (दि. १९) सुरू करण्यात आली. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शनिवारी सायंकाळी तिच्या निर्धारित वेळेला ५.५६ ला दाखल झाली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते राजधानी एक्स्प्रेसचे पूजन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. राजधानी एक्स्प्रेस पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.यावेळी भुसावळ रेल्वे विभागाचे सहायक वाणिज्य प्रबंधक श्याम कुलकर्णी, नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर.के. कुठार, मुख्य आरक्षण पर्यवेक्षक विजय तिवडे, वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, जगदीश गोडसे, अरुण जाधव, नितीन खर्जुल, सुनील देवकर, बळवंत गोडसे, योगेश देशमुख आदींसह प्रवासीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस