येवल्यात तब्बल पावनेसहा तास भारनियमन
By Admin | Updated: October 6, 2014 00:10 IST2014-10-05T22:48:22+5:302014-10-06T00:10:40+5:30
येवल्यात तब्बल पावनेसहा तास भारनियमन

येवल्यात तब्बल पावनेसहा तास भारनियमन
येवला : सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने येवल्यात तब्बल पावनेसहा तास भारनियमनाचे हत्यार उपसले असून, आता दिवाळीदेखील अंधारात साजरी करावी लागणार आहे. भारनियमनासाठी वीज वितरण कंपनीने शहराचे तीन भाग पाडले असून, एकाचवेळी संपूर्ण येवले शहराची वीज गायब असणार आहे. भाग एकमध्ये पारेगावरोड, विंचूररोड, भाग दोनमध्ये थिएटररोड, कचेरीरोड, भाग तीनमध्ये तहसील कचेरी, गंगादरवाजारोड, काळा मारुतीरोड या भागांचा समावेश आहे.