वणी : भाजीपाला खरेदी करण्यास गेलेल्या महिलेची दीड तोळ्याची सोन्याची पोत चोरट्याने लांबविल्याची घटना येथील आठवडे बाजारात घडली. अलका दीपक गांगुर्डे (३२, रा. शाहूनगर, वणी) यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका गांगुर्डे या वणी-पिंपळगाव रस्त्यावरील मंगळवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत काढून पर्समध्ये ठेवली होती व ती पर्स आपल्याकडील पिशवीत ठेवली होती. दरम्यान भाजीपाला खरेदी करण्यात दंग असताना पाळत ठेवून असणाऱ्या चोरट्याने पिशवीतून पोत लांबविली.पाच फूट उंची, शरीराने धिप्पाड, दाढी वाढविलेली, पांढरा शर्ट व काळी पॅन्ट परीधान केलेल्या इसमावर गांगुर्डे यांनी संशय व्यक्त केला आहे. आठवडे बाजारात भ्रमणध्वनी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतानाच ही घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. वणी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आठवडे बाजारातून पोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:21 IST
वणी : भाजीपाला खरेदी करण्यास गेलेल्या महिलेची दीड तोळ्याची सोन्याची पोत चोरट्याने लांबविल्याची घटना येथील आठवडे बाजारात घडली.
आठवडे बाजारातून पोत लांबविली
ठळक मुद्देपाळत ठेवून असणाऱ्या चोरट्याने पिशवीतून पोत लांबविली.