दहा महिन्यांनंतर आठवडे बाजार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 01:14 IST2020-11-08T23:37:08+5:302020-11-09T01:14:33+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू कमी झाल्यानंतर प्रथमतः हाॅटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील अनेक गावांतील आठवडे बाजारालादेखील सुरुवात करण्यात आली असून, ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दहा महिन्यांनंतर भरलेल्या आठवडे बाजारात दिसून आले.

गोंदे दुमाला येथील सुरू झालेल्या आठवडे बाजाराला पहिल्याच दिवशी ग्राहकांनी पाठ फिरवल्याने बाजार सुना-सुना होता.
नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू कमी झाल्यानंतर प्रथमतः हॉटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील अनेक गावांतील आठवडे बाजारालादेखील सुरुवात करण्यात आली असून, ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दहा महिन्यांनंतर भरलेल्या आठवडे बाजारात दिसून आले.
इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे दुमाला येथे वर्षभरापासून भरत असलेला आठवडे बाजार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आला होता. शासनाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.७) रोजी गोंदे दुमाला येथील गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या आठवडे बाजाराला सुरुवात करण्यात येणार असल्यामुळे सरपंच शरद सोनवणे यांनी व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी, खेळणी दुकानदार आदींना दोन दिवसांपूर्वीच आमंत्रण दिले होते.
आठवडे बाजाराला सुरुवात झाली असल्याने दुकानदार तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळीच थाटली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सुरू झालेल्या आठवडे बाजाराच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा जेमतेम प्रतिसाद लाभल्यामुळे गोंदे ग्रामपंचायतीचे आर्थिक गणित कोलमडून पडले. पुढील शनिवारी तालुक्यातील इतरही आठवडे बाजार सुरू होत असल्यामुळे गोंदे दुमाला येथे भरणाऱ्या दर शनिवारीच्या आठवडे बाजाराला पहिल्यासारखा प्रतिसाद मिळेल व आठवडे बाजार सुरळीतपणे सुरू होईल.
कोरोनाच्या भीतीपोटी अजूनही नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असल्यामुळे व्यापारी व दुकानदारांनी पहिल्याच दिवशी भरलेल्या आठवडे बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
- शरद सोनवणे. लोकनियुक्त सरपंच, गोंदे दुमाला