आठवडे बाजार बंदचा निर्णय
By Admin | Updated: May 26, 2017 23:36 IST2017-05-26T23:36:27+5:302017-05-26T23:36:43+5:30
सायखेडा : महाराष्ट्रातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संप पुकारणार असून, या संपाचे लोण निफाड तालुक्यात पसरले आहे.

आठवडे बाजार बंदचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : महाराष्ट्रातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संप पुकारणार असून, या संपाचे लोण निफाड तालुक्यात पसरले आहे. गोदाकाठ भागातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याचा एकमुखी निर्णय म्हाळसाकोरे, भेंडाळी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावाने पुकारलेल्या संपाचे लोण पसरण्यास सुरुवात झाली असून, नाशिक जिल्ह्यात या संदर्भात तालुका, प्रत्येक गावनिहाय बैठकांचे नियोजन सुरू आहे. या बैठकीत गावातील भाजीपाला, दूध विक्र ी केले जाणार नाही. गावातील एकही दूध केंद्र या दिवसात सुरू असणार नाही. भेंडाळी, म्हाळसाकोरे येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
संप काळात गावातील एकही गाडी शेतमाल घेऊन बाजार समितीत जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी किसान क्र ांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक धोंडीराम रायते, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, भेंडाळीचे सरपंच गोरख खालकर, म्हाळसाकोरेचे सरपंच सुधीर शिंदे, माजी सदस्य सोपान खालकर, शिवसेनेचे गटप्रमुख शरद खालकर उपस्थित होते.