मतदानासाठी आठवडे बाजाराला सुटी

By Admin | Updated: February 10, 2017 22:58 IST2017-02-10T22:58:19+5:302017-02-10T22:58:33+5:30

मतदानासाठी आठवडे बाजाराला सुटी

Weekend for the weekend to vote | मतदानासाठी आठवडे बाजाराला सुटी

मतदानासाठी आठवडे बाजाराला सुटी

नाशिक : येत्या २१ फेबु्रवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानापासून मतदार वंचित राहू नयेत म्हणून निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात असल्याने त्याचाच भाग म्हणून मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. आता ग्रामीण भागात मंगळवारी दि. २१ रोजी मतदान होणार असल्याने या दिवशी गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. त्यात करंजगाव, उगाव, ओझर, वावी या गावांचा समावेश आहे.

Web Title: Weekend for the weekend to vote