उपबाजारात आठवडे बाजार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:46 IST2017-09-25T00:46:28+5:302017-09-25T00:46:32+5:30
शेतकरी, व्यापाºयांच्या व्यवसायाचा व सर्वसामान्यांना ताजा शेतीमाल स्वस्त भावांत मिळावा, असा विचार करून सिन्नरफाटा उपबाजार समितीच्या आवारात दर शनिवारी आठवडे बाजार भरविण्यास प्रारंभ केल्याचे बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी सांगितले.

उपबाजारात आठवडे बाजार सुरू
नाशिकरोड : शेतकरी, व्यापाºयांच्या व्यवसायाचा व सर्वसामान्यांना ताजा शेतीमाल स्वस्त भावांत मिळावा, असा विचार करून सिन्नरफाटा उपबाजार समितीच्या आवारात दर शनिवारी आठवडे बाजार भरविण्यास प्रारंभ केल्याचे बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिन्नर फाटा उपबाजार समितीच्या आवारात दर शनिवारी भरविण्यात येणाºया आठवडे बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी चुंबळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती संजय तुंगार, संचालक प्रवीण नागरे, रावसाहेब खांडबहाले, युवराज कोठुळे, संदीप पाटील, पप्पू खंदारे, चंद्रकांत निकम, विमलबाई जुंद्रे, समितीचे सचिव महेंद्र निकाळे, व्यापारी सुनील कांबळे, लक्ष्मण सोनवणे, गोरख गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच आठवडे बाजाराच्या दिवशी भाजीपाला, धान्य, विविध वस्तू आदिंची दुकाने शेतकरी, विक्रेत्यांनी थाटली होती. यावेळी चुंबळे यांनी उपबाजार समितीच्या कर्मचाºयांना आठवडे बाजार यशस्वीरीत्या सुरू होण्याबाबत विविध सूचना केल्या. यावेळी बाळू भोर, शिवाजी म्हस्के, ज्ञानेश्वर तुंगार, यशवंत पवार, बाजार समिती शाखा प्रमुख सोमनाथ पिंगळे, रवींद्र तुपे, लालदास तुंगार, बाळासाहेब पोवळे, अनिल हांडोरे, अशोक पाळदे, नंदू सोनवणे आदिंसह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.
सोयी-सुविधांची गरज
सिन्नर फाटा उपबाजार आवार समितीच्या आवारात विविध समस्या, प्रश्न असून ते मार्गी लावण्याचे गरजेचे आहे. आठवडे बाजारासाठी जागा सपाटीकरण, वाहनतळासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रकाश योजना करणे, स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे तेथील सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी केली आहे.