हॉटेलसमोरील  रस्त्यावरच भरतो आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:12 IST2018-04-29T00:12:58+5:302018-04-29T00:12:58+5:30

आडगाव शिवारातील जत्रा हॉटेलसमोरील रस्त्यावर दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. मुंबई-आग्रा महामार्गावरील बहिणाबाई महाविद्यालय ते थेट कोणार्कनगरपर्यंत सर्व्हिस रोडवर भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतूक कोंडी होतेच; शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 A weekday market on the road ahead of the hotel | हॉटेलसमोरील  रस्त्यावरच भरतो आठवडे बाजार

हॉटेलसमोरील  रस्त्यावरच भरतो आठवडे बाजार

आडगाव : आडगाव शिवारातील जत्रा हॉटेलसमोरील रस्त्यावर दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. मुंबई-आग्रा महामार्गावरील बहिणाबाई महाविद्यालय ते थेट कोणार्कनगरपर्यंत सर्व्हिस रोडवर भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतूक कोंडी होतेच; शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आठवडे बाजार भरतो. पण मागच्या काही दिवसांपासून येथे बाजाराची व्याप्ती वाढत असून, मुंबई-आग्रा महामार्गावरील बहिणाबाई शिक्षण महाविद्यालय ते थेट कोणार्कनगरपर्यंत असलेल्या सर्व्हिस रोडवर बाजार भरतो. हा रोड मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन स्थानिक नागरिकांना त्रास कमी व्हावा, या हेतूने तयार केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक मोठ्या संख्येने बाजारात खरेदीसाठी येतात. पण रस्त्यावर भरणाºया या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. खरेदीसाठी येणारे सर्व नागरिक जागेअभावी गाड्या सर्व्हिस रोडवरच लावतात. रस्त्यावर भरणाºया या आठवडे बाजारामुळे जत्रा चौफुलीवर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाणदेखील वाढत आहे. शिवाय त्यामुळे वाद व शाब्दिक चकमकी पाहायला मिळतात. शिवाय धोकादायक जत्रा चौफुलीसुद्धा जवळच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा परिणाम जत्रा चौफुलीवरील वाहतुकीवर होतो. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे-येणे मोठे जिकिरीचे ठरते. पूर्वी बाजार छोटा होता तोपर्यंत अडचण नसायची. पण आता बाजारात होणाºया गर्दीमुळे या ठिकाणी पायी चालणेही मुश्कील होते. शिवाय बाजार आटोपल्यानंतर नियमित साफसफाई या रस्त्यावर होत नाही. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्नदेखील निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक नगरसेवक व महानगरपालिका अधिकारी यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती बळावते.

Web Title:  A weekday market on the road ahead of the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.