संघाच्या वतीने शस्त्रपूजन
By Admin | Updated: October 21, 2015 23:04 IST2015-10-21T22:49:04+5:302015-10-21T23:04:41+5:30
संघाच्या वतीने शस्त्रपूजन

संघाच्या वतीने शस्त्रपूजन
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंदिरानगर येथील मोदकेश्वरनगरचे विजयादशमी शस्त्रपूजन उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद पवार, प्रमुख वक्ते म्हणून गजानन होडे उपस्थित होते. भारतीय संस्कृती ही प्राचीन विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी आहे. भारत अजूनही विश्वविजयी क्षमता बाळगून असल्याचे मत होडे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रसाद पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी अतिथींचा परिचय कार्यवाह शशिकांत पंडित यांनी करून दिला. सूत्रसंचालन ओमकार शौचे यांनी, तर संतोष देवगडे यांनी आभार मानले. मंगेश खाडीलकर, सुनील नांदेडकर आदि मान्यवर उपस्थित होेते. (प्रतिनिधी)