केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवू : हंसराज अहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:11+5:302021-09-02T04:29:11+5:30

गवळी युवा शैक्षणिक व सेवाभावी संस्था आणि भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर यांनी स्वप्नपरी पॉम, समर्थनगर येथे आयोजित केलेल्या ...

We will take the Centre's plans to the grassroots: Hansraj Ahir | केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवू : हंसराज अहिर

केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवू : हंसराज अहिर

गवळी युवा शैक्षणिक व सेवाभावी संस्था आणि भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर यांनी स्वप्नपरी पॉम, समर्थनगर येथे आयोजित केलेल्या गुणवंत गुणगौरव सोहळा कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर गवळी होते. धुळ्याचे प्रभारी महापौर भगवान शंकरआप्पा गवळी यांचेसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बंडूकाका बच्छाव यांनी गवळी समाजाचे कौतुक केले. भाजपाचे गटनेते सुनील गायकवाड यांनी केंद्राकडून मालेगाव शहराच्या विकासासाठी व गवळी समाजासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. धुळ्याचे प्रभारी महापौर भगवान शंकर गवळी यांनीही मार्गदर्शन केले. ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे उपाध्यक्ष वसंत गवळी यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व गवळी समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक माजी नगरसेवक गुलाब पगारे यांनी केले.

फोटो फाईल नेम : ३१ एमएयुजी २० . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी गवळी युवा शैक्षणिक व सेवाभावी संस्था आणि भाजपातर्फे आयोजित गुणवंत गुणगौरव सोहळ्यात दहीहंडी फोडताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर. समवेत गुलाब पगारे, सुनील गायकवाड, बंडूकाका बच्छाव आदी.

310821\591431nsk_28_31082021_13.jpg

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.

Web Title: We will take the Centre's plans to the grassroots: Hansraj Ahir