मनपाच्या निषेधार्थ ‘आम्ही मालेगावकर’चे धरणे
By Admin | Updated: January 4, 2016 23:57 IST2016-01-04T23:26:20+5:302016-01-04T23:57:14+5:30
मनपाच्या निषेधार्थ ‘आम्ही मालेगावकर’चे धरणे

मनपाच्या निषेधार्थ ‘आम्ही मालेगावकर’चे धरणे
मालेगाव : येथील महानगरपालिका आयुक्तांनी शहर स्वच्छता व औषध फवारणी करण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावर कारवाई न केल्याने येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून, शहरा औषध फवारणी केली जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संघटनेतर्फे १४ डिसेंबरला मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. मनपातर्फे कारवाई करण्यात आली नाही.
येथील गांधी पुतळ्याजवळ झालेल्या धरणे आंदोलनात देवा पाटील, दादा बहिरम, दीपक पाटील, निखिल पवार, रविराज सोनार, देवेंद्र अलई, यशवंत खैरनार, अतुल शिरोडे, राहुल देवरे, देवा घाग, अनिल अहिरे आदि सहभागी झाले होते. मालेगाव येथे महापालिकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलनात सहभागी ‘आम्ही मालेगावकर’ संघटनेचे देवा पाटील, निखिल पवार, दादा बहिरम, दीपक पाटील, रविराज सोनार, देवेंद्र अलई आदि.