आम्ही, भाऊंचेच कार्यकर्ते

By Admin | Updated: February 14, 2017 01:57 IST2017-02-14T01:56:19+5:302017-02-14T01:57:11+5:30

आम्ही, भाऊंचेच कार्यकर्ते

We, Brothers' activists | आम्ही, भाऊंचेच कार्यकर्ते

आम्ही, भाऊंचेच कार्यकर्ते

पाथर्डी फाटा : मनपा निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतशी तरुण कार्यकर्त्यांची उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. आम्ही भाऊंचेच कार्यकर्ते असल्याचे सांगून प्रचारयंत्रणा सांभाळणाऱ्यांबरोबरच मिटिंग आणि सेटिंगच्या गप्पा करू लागले आहेत. बरे अत्यंत नाजूक काळात त्यांना कोण कुठले म्हणून विचारता येईना, त्यामुळे उमेदवारांचीही पंचाईत झाल्याचे दिसते.  पाथर्डी फाटा परिसरात जवळपास सर्वच उमेदवारांची प्रचार कार्यालये आहेत. दिवसभर या कार्यालयांमध्ये फारशी गर्दी नसते. मात्र सायंकाळ होताच कार्यालये गजबजू लागतात. गर्दी वाढू लागते. त्यात काही प्रामाणिक कार्यकर्ते आणि उमेदवारांचे हितचिंतक नक्कीच असतात; परंतु त्यांची संख्या फारशी नसते. अनाहुत कार्यकर्त्यांची संख्या मात्र सायंकाळच्या सुमारास वाढत आहे.  अमुक एका ग्रुपचा किंवा मंडळाचा पदाधिकारी असून आपल्याकडे इतके-इतके कार्यकर्ते आहेत. आपण मिटिंग करू आणि काय ते ठरवून, असे सौदा करीत आहेत. काही मंडळी-आमची नावं मतदार यादीत आहेत का, ते पहायचे होते म्हणून कार्यालयात येतात आणि यादी पाहून आमचे एवढे मतदार आहेत त्यांचं काय ते बघा म्हणून सूचक वक्तव्य करताना दिसून येतात. काहीजण पाच-पन्नास मतदारांच्या नावांची यादीच घेऊन येत आहेत.  यामध्ये काही महिलांचेही गट प्रचार कार्यालयांमध्ये जाऊन आमच्याकडेही एकगठ्ठा मतदान असून आम्ही तुमचेच काम करणार आहोत, तुमच्याच पाठीशी आहोत, अशी ग्वाही देऊन उमेदवाराबरोबर खर्चाची भाषा करीत आहेत. सकाळी आणि सायंकाळी या प्रचार कार्यालयांमध्ये चहा-नाश्त्याची सोय होते म्हणून काही मंडळी या वेळेत आवर्जून हजेरी लावतात. विशेष म्हणजे उपरोक्त प्रकारातली मंडळी एकाच प्रचार कार्यालयात जातात असे नाही, तर जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये त्यांचा आलटून-पालटून वावर असतो. काही उमेदवारांनी रोजच्या जेवणावळी सुरू केल्याने सायंकाळी त्यासाठी बरीच मंडळी प्रचार कार्यालयांच्या व किचन असलेल्या ठिकाणी घुटमळताना दिसतात. या सर्व कारणांनी सायंकाळी प्रचार कार्यालयांमध्ये गर्दी वाढलेली दिसून येते. या ‘नकोशी’ कार्यकर्त्यांचे करायचे काय, असा प्रश्न उमेदवारांनाही पडला आहे. (वार्ताहर)

Web Title: We, Brothers' activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.