शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सोशल मीडियामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 10:43 PM

कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांनाही जगविण्यासाठी सहकार्य करा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल पिंपळगाव येथील प्राणिमित्रांनी घेत भूतदयेचा संदेश देत नाशिक शहरातील गोशाळा व मोकाट जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मार्गी लावला आहे.

ठळक मुद्देभूतदयेचा संदेश : प्राणिमित्रांकडून आवाहनाची दखल

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांनाही जगविण्यासाठी सहकार्य करा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल पिंपळगाव येथील प्राणिमित्रांनी घेत भूतदयेचा संदेश देत नाशिक शहरातील गोशाळा व मोकाट जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मार्गी लावला आहे.नाशिक शहरात आजमितीस तीन मोठ्या गोशाळा आहे. त्यात पंचवटी, तपोवन व पाथर्डी फाटा आदी ठिकाणचा समावेश आहे. रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे व कत्तल करण्यासाठी असलेल्या गाई तेथे जमा केल्या जातात. आज शेकडो गाई याठिकाणी आहेत. त्यांच्या चारा पाण्यासाठी दानशूर व्यक्ती व प्राणिमित्र वेळोवेळी सहकार्य करीत असतात.मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन व संचारबंदी असून, रहदारी व दळणवळण बंद झाल्याने या गोशाळांतील जनावरांना चाºयाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यासाठी तपोवन येथील कृषी गोशाळेच्या संचालिका रु पाली जोशी यांनी सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ते व प्राणिमित्रांना चारा व पाण्यासाठी आवाहन केले होते. त्याची दखल पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वायकंडे, रुपेश धुळे, सोमनाथ डंबाळे आदींनी घेत परिसरातून शेतकºयाच्या शेतातून चारा खरेदी केला व तो चारा कृषी गोशाळेसह परिसरातील मोकाट जनावरे तसेच पांजरापोळ आदी ठिकाणी दिला.

सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने घराबाहेर निघणे मुश्कील आहे. अशावेळी जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यासाठी सोशल मीडियावर कळविले असता पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणताही मोबदला न घेता एक गाडी चारा आणून देत जनावरांची सोय करून दिली आहे.- रु पाली जोशी, कृषी गोशाळा, नाशिक

आजमितीस सर्व सजीवांना कोरोना विषाणूच्या संकटाने घेरले आहे. सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे काहींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, परंतु भूतदया जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणीही अन्नपाण्याविना दूर राहणार नाही. आम्हाला समजल्यानंतर आम्ही चारा घेतला व मोफत वितरित केला.- सोमनाथ वायकंडे, प्राणिमित्र, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार