शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 22:55 IST

दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : ननाशी, कोशिबे परिसरात समाधानकारक पाऊस

दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधीलपाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.तालुक्यात पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू असून तुलनेने पूर्व भागात कमी पाऊस होत आहे. तालुक्यातील कोलवण, कादवा, धामण नद्या खळखळून वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे पालखेड धरणातीलपाणीसाठा ९४ टक्के झाला असून, पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात ८०० क्युसेसपाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे वाघाड धरण ८६ टक्के भरले. पावसाचा जोर वाढल्यास दोन दिवसांत वाघाड धरण पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ५४ टक्क्याच्या आसपास पोहचले असून, ननाशी व कोशिबे परिसरात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.तालुक्यातील मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यामुळे पुणेगाव धरणात मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. पुणेगाव धरण पूर्ण भरल्याशिवाय ओझरखेड धरणामध्ये पाणी येत नसल्यामुळे सध्या धरणाचा पाणीसाठा ३७ इतकाच झाला आहे. तालुक्यात सर्वात कमी पाणीसाठा २२ टक्के तिसगाव धरणाचा असल्यामुळे तिसगाव परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :DamधरणWaterपाणी