विंचूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजना अंतर्गत ३३ बंधाऱ्यांचे गाळ काढणे व दुरु स्ती नवीन बंधारे बांधणी तसेच किसन वाडी लगतच्या डोंगरावर केलेल्या समांतर चरांमुळे व पावसाच्या पाण्याने बंधारे भरले आहेत. खासदार भारतीपवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, पंचायत समिती सभापती सोमनाथ पानगव्हाणे, उपसभापती गुरु भाऊ कांदे, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, सरपंच ताराबाई क्षीरसागर, संजय वाबळे, कैलास सोनवणे , गंगाधर गोरे, किशोर पाटील, काका दरेकर , डॉ. सालगुडे, निलेश सालकाडे, पप्पू शेख, गोरख सोनवणे ,वंदना कानडे, मंजुषा पाटील,स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे ,राजेंद्र कानडे, दिलीप चव्हाण, संधान यासह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
विंचूरला बंधाऱ्याचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:23 IST