पाणीविरहित रंगपंचमी

By Admin | Updated: March 26, 2016 23:26 IST2016-03-26T23:04:21+5:302016-03-26T23:26:24+5:30

पाणीविरहित रंगपंचमी

Waterless colorful | पाणीविरहित रंगपंचमी

पाणीविरहित रंगपंचमी

 येवला : ऐतिहासिक रंगपंचमीला फाटा देऊन कोरडा टिळा लावून रंगपंचमी साजरी करण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे किमान पाच लाख लिटर पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी येवल्यातील तरु ण मंडळ व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. पाण्याची नासाडी न करता रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता टिळक मैदान येथे सर्व येवलेकरांनी एकत्रित येऊन शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, प्रत्येकाला गुलालाचा अथवा कोरड्या रंगाचा टिळा लावून पाण्याची नासाडी न करता रंगपंचमी साजरा करण्याचे ठरले आहे. माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी व संस्कृतिकार प्रभाकर झळके यांनी यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Waterless colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.