नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग
By Admin | Updated: August 8, 2016 00:14 IST2016-08-08T00:13:52+5:302016-08-08T00:14:00+5:30
नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग

नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग
निफाड : रविवारी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ४३४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी ९ वाजता हा विसर्ग ६१,००० क्युसेक होता तो कमी करून दुपारी १२ वाजता ५०,००० क्युसेक करण्यात आला. जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, पालखेड, कडवा मिळून फक्त २३००० क्युसेक इतका विसर्ग चालू असल्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून दुपारी २ वाजता ४३४५६ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला.
निफाडचे प्रांत शशिकांत मंगरु ळे, तहसीलदार विनोद भामरे, निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांचे पथक पूरग्रस्त गावातील स्वच्छता, पाणी, पंचनामे, पूरग्रस्त नागरिकांचे निवारे, याबाबत प्रशासकीय पातळीवर व्यवस्था लावत असल्याचे दिसून आले. (वार्ताहर)