वर्गणी गोळा करून शिक्षकांकडून पाण्याचे टँकर
By Admin | Updated: April 12, 2016 23:45 IST2016-04-12T23:43:25+5:302016-04-12T23:45:31+5:30
वर्गणी गोळा करून शिक्षकांकडून पाण्याचे टँकर

वर्गणी गोळा करून शिक्षकांकडून पाण्याचे टँकर
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दात्याणे येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीवर्गणी गोळा करून भाऊसाहेबनगर येथे पाण्याचे टँकर दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
दुष्काळाचे चटके शिक्षकांच्या संवेदनशील मनाला लागले व पाण्यासाठी दाही दिशा हिंडणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करण्याचे शिक्षकांनी ठरविले. विनाअनुदानित शाळेत तुटपुंज्या वेतनावर काम करूनसुद्धा आर्थिक तरतूद उभी केली. कर्मवीर वसंतराव पवार जयंतीपासून दररोज पंधरा हजार, वीस हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोणतीही सुट्टी न घेता प्रत्येक दिवशी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी टप्प्याने पाणीवाटप करून पाण्याचे महत्त्व सांगतात. यात भाऊसाहेबनगर, ओणे व दात्याणे याठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यात विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद ताकाटे, सुवर्णा खालकर, कांचन हुजरे, श्वेता पानगव्हाणे, श्रीमती घुले, कल्पेश रायते, प्रशांत कदम, भूषण आहेर, मनोज वाघ, गोकुळ पवार, राजेंद्र पवार, गणेश डोकबाणे, साहेबराव आहेर, दीपक काळे यांचे परिसरात कौतुक होत आहे. (वार्ताहर)वर्गणी गोळा करून शिक्षकांकडून पाण्याचे टँकरपिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दात्याणे येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीवर्गणी गोळा करून भाऊसाहेबनगर येथे पाण्याचे टँकर दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
दुष्काळाचे चटके शिक्षकांच्या संवेदनशील मनाला लागले व पाण्यासाठी दाही दिशा हिंडणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करण्याचे शिक्षकांनी ठरविले. विनाअनुदानित शाळेत तुटपुंज्या वेतनावर काम करूनसुद्धा आर्थिक तरतूद उभी केली. कर्मवीर वसंतराव पवार जयंतीपासून दररोज पंधरा हजार, वीस हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोणतीही सुट्टी न घेता प्रत्येक दिवशी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी टप्प्याने पाणीवाटप करून पाण्याचे महत्त्व सांगतात. यात भाऊसाहेबनगर, ओणे व दात्याणे याठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यात विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद ताकाटे, सुवर्णा खालकर, कांचन हुजरे, श्वेता पानगव्हाणे, श्रीमती घुले, कल्पेश रायते, प्रशांत कदम, भूषण आहेर, मनोज वाघ, गोकुळ पवार, राजेंद्र पवार, गणेश डोकबाणे, साहेबराव आहेर, दीपक काळे यांचे परिसरात कौतुक होत आहे. (वार्ताहर)