शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावांसाठी लवकरच टँकर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:12 IST

तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली.

येवला : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना लवकरच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. याबाबत जाधव यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना सांगितले की, येवला तालुक्यातील अनकाई, वसंतनगर, गोरखनगर, सोमठाण जोश, राजापूर, भुलेगाव, पांजरवाडी, आडसुरेगाव, तळवाडे, शिवाजी नगर, रेंडाळे, गारखेडे, सायगाव, महादेववाडी, जायदरे, ममदापूर तांडावस्ती, निळखेडे, हडप सावरगाव, देवठाण, तांदूळवाडी या १८ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २८ मार्च रोजी प्रस्ताव प्राप्त झाले आहे. मात्र अद्यापदेखील त्यावर निर्णय घेण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राधाकृष्णन बी. म्हणाले की, येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देऊन तत्काळ येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतील. मात्र त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, टंचाईमुळे शेतीची कामे बंद आहेत. त्यामुळे ज्यांना कामे नाहीत अशा मजुरांनी रोजगार हमीद्वारे केल्या जाणाऱ्या जलसंधारणाच्या कामांवर जावे, असे आवाहन केले. त्यामुळे आता लवकरच येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध होणार आहे.भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराणयेवला तालुक्यातील धनकवाडी आणि गणेशपूर येथील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडून उपविभागीय कार्यालयाकडे पाठविलेले आहेत, तर वाघाळे, देवदरी, खरवंडी, नायगव्हाण आणि नगरसूल वाड्यावस्त्या असे पाच गावांचे प्रस्ताव तालुकास्तरावर आहेत. त्याचबरोबर तालुक्यात प्रचंड पाणीटंचाई वाढली असून, पंचवीस गावांचे प्रस्ताव विविध कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसले असताना दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव लाल फितीत अडकवले जात आहेत. येथील भीषण पाणीटंचाईचा विचार करून वरील टंचाईग्रस्त गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी जाधव यांनी केली.

टॅग्स :Waterपाणी