शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

पंधरा वर्षांपासून टॅँकरचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:36 IST

नांदगाव तालुक्यातील मोरझर गावाची लोकसंख्या जेमतेम ११००. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थांची तहान टँकरच भागवित आहे. अशी या गावाची कथा. घरातील प्रत्येकाने हंडा किंवा बादली भरून पाणी आणून देणे हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

नांदगाव : स्थळ : मोरझर, वेळ : सकाळी १० वाजल्याची..डोक्यावर हंडा ठेवून महिला पाण्यासाठी निघाल्या. कोणाच्या पायात रबरी चप्पल, फाटके पायताण, तर काही अनवाणी. तापलेल्या जमिनीचे चटके पायांना बसताहेत, तर वरून सूर्य आग ओकतो आहे.नांदगाव तालुक्यातील मोरझर गावाची लोकसंख्या जेमतेम ११००. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थांची तहान टँकरच भागवित आहे. अशी या गावाची कथा. घरातील प्रत्येकाने हंडा किंवा बादली भरून पाणी आणून देणे हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. येथील महिलांचे आयुष्य केवळ पाणी आणि पाणी या समस्येनेच व्यापलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीच काळजी व तोच उद्योग. पाणी आणणे.. पाणी आणणे... पाण्यासाठीसुद्धा टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.गावात जलस्रोतच नसल्याने अडथळेमोरझर गावाची लोकसंख्या साधारणत: ११०० असून, आर्थिक स्तर जेमतेमच आहे. गावात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. एक सार्वजनिक विहीर आणि हातपंप असून, त्यालाही पाऊस बरा पडला तरच पाणी येते. गाव परिसरात कोणताही कायमस्वरुपी जलस्रोत नसल्याने गावात कोणतीही पाणीपुरवठा योजना होऊ शकलेली नाही. या गावाला टँकरशिवाय पर्याय उपलब्ध नाही.चारा छावणी नसल्याने गंभीर स्थितीगावात पाणीटंचाई पाचवीला पूजलेली. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर. चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपली लाडकी जनावरे मातीमोल भावात विकावी लागत आहे. अनेकांनी तर नातेवाइकांकडे सांभाळायला दिली आहेत. परिसरात कुठेही चारा छावणी नाही. रोजगाराचे कुठलेही साधन नाही. शेतीतून उत्पन्न नाही. त्यामुळे मुला-मुलींचे लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. पाहुणे येणार म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो.सरपंच म्हणतात़़़पाणीच नसल्याने जनावरांना खराब पाणी पाजावे लागते. पाण्याचा वास येत असल्याने जनावरे पाणी पीत नाही. महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याने महिलांना कुठेही जाता येत नाही. दिवसभर एकच काम ते म्हणजे हंडाभर पाणी गोळा करणे. गावासाठी स्वतंत्ररीत्या पाणीपुरवठा योजना मंजूर होणे गरजेचे आहे.- योजना चोळके, सरपंच

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी