भर पावसाळ्यात महिलांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:12+5:302021-09-04T04:18:12+5:30

गोंदे दुमाला : राजकीय वारसा व वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे गेल्या महिनाभरापासून नागरिक दैनंदिन ...

Water supply to women by tanker during heavy rains | भर पावसाळ्यात महिलांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

भर पावसाळ्यात महिलांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

गोंदे दुमाला : राजकीय वारसा व वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे गेल्या महिनाभरापासून नागरिक दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. येथे एकाच महिन्यात जवळपास चार रोहित्र बदलूनदेखील विजेचा प्रश्न सुटत नसल्याने येथील महिलांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर जाऊन भटकंती करावी लागत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील २ हजार लोकसंख्या असलेल्या पाडळी देशमुख येथे दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे येथील नागरिक मेटाकुटीस आले असून वीज वितरणच्या या सावळ्या गोंधळामुळे येथील महिलांनादेखील खंडित पुरवठ्याचा सामना करावा लागत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर जाऊन वणवण करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वीज वितरण कंपनीने एकाच महिन्यात जवळपास चार रोहित्र बदलले असले तरी वीज पुरवठा खंडित होण्यापासून थांबत नसल्यामुळे नक्की काय प्रकार आहे हे वीज वितरण कंपनीने याचा शोध घेऊन लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे पाडळी देशमुख येथे गेल्या काही दिवसांपासून भर पावसाळ्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. या ठिकाणी वीजवाहक तारा लोंबकळत असून येथील विजेचे खांब अतिशय जीर्ण झाल्यामुळे ते कधी खाली कोसळतील याचा भरवसा नाही. तसेच येथे वीजपुरवठा नेहमीच खंडित होण्याचे प्रमाण अधिक होत असते. तरी वीज वितरण कंपनीने जीर्ण झालेले विजेचे खांब व जीर्ण झालेल्या वीज तारा बदलण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

-------------

दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आॅनलाईन शिक्षण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच इतर महत्त्वाच्या कामांना अडथळा निर्माण होत आहे. गावातील विजेचे खांब अतिशय जीर्ण झाले असून वीज वाहक तारा लोंबकळत असल्याने त्या नव्याने बदलण्याची अत्यावश्यक गरज असून जर वीज वाहिन्या भूमिगत केल्यास विजेसंबंधी अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

- फकिरराव धांडे, अध्यक्ष, कर्मयोगी प्रतिष्ठान. पाडळी देशमुख.

पाडळी देशमुख येथे वीज वितरणच्या दैनंदिन खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे महिलांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे चित्र. (०३ गोंदे १)

030921\03nsk_13_03092021_13.jpg

०३ गोंदे १

Web Title: Water supply to women by tanker during heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.