शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:39 IST

चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.

ठळक मुद्देचांदगाव : पाणीटंचाईवर उपाय; प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

येवला : तालुक्यातील चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. तीन तासांत तब्बल १७ हजार ३०० रु पये लोकवर्गणी जमा झाली. या लोकवर्गणीतून गावासाठी पाणी टँकर सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे सामाजिक अंतर राखत गावात पाणी वाटप केले गेले.चांदगाव येथे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव सादर केला मात्र, पंधरा दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत टँकर मंजूर झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याने टँकर कधी मंजूर होतो, याची गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे.ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न बिकट बनला. पडीक विहिरीतून पाणी शुद्ध की अशुद्ध यांची शहानिशा न करता जीव धोक्यात घालून सर्रास पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गावातील तरु णांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे विदारक सत्य मांडून लोकवर्गणीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, तीन तासांतच १७ हजार ३०० रु पये जमा झाले व अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामस्थांबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकांनी गावाला पाणीटंचाईच्या या संकटात रक्कम देऊ केली. शासकीय टँकर चालू होत नाही, तोपर्यंत १ टँकर कायमस्वरु पी पुरविण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी या लोकवर्गणीतून घेतली आहे. दरम्यान, तरु णांच्या या युक्तीने प्रशासनावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी आपली पाण्याची गरज पूर्ण केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी