सिन्नर महाविद्यालयाकडून मनेगाव येथे पाणीपुरवठा

By Admin | Updated: May 18, 2016 00:23 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-18T00:23:09+5:30

दिलासा : प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी काढली वर्गणीसिन्नर

Water supply from Sinnar College in Manegaon | सिन्नर महाविद्यालयाकडून मनेगाव येथे पाणीपुरवठा

सिन्नर महाविद्यालयाकडून मनेगाव येथे पाणीपुरवठा

: तालुक्यातील मनेगाव येथे सिन्नर महाविद्यालयाच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यापर्यंत मनेगावकरांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवणार असल्याचे मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत यांनी सांगितले.
मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या संकल्पनेतून सिन्नर महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी काढलेल्या वर्गणीतून मनेगाव येथे दर आठवड्याला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस पडेपर्यंत ‘मविप्र जलसेवा’ हा उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचे संचालक भगत व प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी सांगितले. पाणीटंचाईच्या झळा सोसत असताना सिन्नर महाविद्यालयाने राबविलेल्या पाणीपुरवठा उपक्रमाबद्दल लीलाबाई शिंदे यांनी आभार मानले.
याप्रसंगी राजाराम मुरकुटे, रावसाहेब सोनवणे, सरपंच अण्णासाहेब सोनवणे, नरहरी सोनवणे, माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे, मविप्रचे सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी आर.के. मुंगसे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी एस. जी. भागवत, आर. टी. सोनवणे, एल. एस. चांदोरे, बी.के. सोनवणे, जावेद शेख, एम. आर. शिंदे, के. डब्ल्यू सोनवणे, नामदेव पडवळ, गणेश कर्डक, अण्णा कर्डक, राजाराम सोनवणे, संतोष सोनवणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Water supply from Sinnar College in Manegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.