शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भाताच्या रोपांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 16:41 IST

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

पाऊस नसल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता तालुक्यातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यावर्षी 'ना पाऊस ना धान्य' अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असून, भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांवर भाताच्या रोपांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

भारताची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात महिनाभरापासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीन, भात, भुईमूग, नागली, वरी, खुरासनी आदी पिके संकटात सापडली आहेत. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील ऐन बहरात येणारी व आलेली भातशेती संकटात सापडली असून, सध्या भाताच्या रोपांची वाढ खुंटली आहे. भातासह इतर रोपांना याकाळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.

मात्र, पाऊसच गायब झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे भातशेती संकटात सापडली आहे. बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची प्रतीक्षा लागली आहे. भाताच्या रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत रोपांना जीवनदान दिले आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील धरणांनीदेखील तळ गाठला असल्याने धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात काही भागात भाताची रोपे करपू लागली असून, याचा परिणाम पुढील काळात होणाऱ्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरी ९७ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आनंद वार्तामुळे बळीराजा सुखावला होता. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली.

मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्याची सद्यस्थिती.धरण. दशलक्ष घनफूट. टक्केदारणा ३२४८ ४५.४३भावली धरण - ६२५ ४३.५८मुकणे धरण - १७७३ २४.९९कडवा धरण - २३६ १३.९८भाम धरण - १७८ . ७.२४नांदूरवैद्य येथे भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करतांना शेतकरी. (०८ नांदूरवैद्य १)

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीकपात