शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत
By Admin | Updated: October 19, 2015 21:51 IST2015-10-19T21:48:05+5:302015-10-19T21:51:56+5:30
शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत

शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत
इंदिरानगर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने पाणीकपात केली आहे. मात्र नियोजित वेळेत पुरेसे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार होत आहे. इंदिरानगरसह शहरातील अनेक भागात अशाप्रकारचा अनुभव नागरिकांना येत आहे.
महापालिकेने शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर इंदिरानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात उपवास असतानाही महिला वर्गास पाणी भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरातील शास्त्रीनगर, मोदकेश्वर कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, देवेंद्र सोसायटी, पाटील गार्डन, सिद्धी विनायक सोसायटीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी कमी येत असल्याने परिसरातील जलकुंभ भरला जात नाही परिणाम अपुरा पाणीपुरवठा होतो. नवीन पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार परिसरात एकच वेळ पाणीपुरवठा होत होत असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पाणी दिवसाआडच येते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात पाणीपुरवठ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.