शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल थकल्याने  पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:04 IST

ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २००७पासून सुरू करण्यात आली होती

ठाणगाव : ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २००७पासून सुरू करण्यात आली होती. उंबरदरी धरणातून ही पाणीपुरवठा योजना करण्यात आली असून, वीजबिल थकल्याने योजना ठप्प झाली आहे. वीज वितरण कंपनीचे वीस लाखांच्या पुढे बिल थकले असून, वीज कंपनीच्या वतीने जोडणी तोडण्यात आली आहे. उंबरदरी धरणात मुबलक पाणी शिल्लक असताना केवळ वीजजोडणी कापल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात उंबरदरी धरणातून रब्बी पिकासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे महिलावर्गाची कपडे धुण्यासाठी म्हाळुंगी नदीवर गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाणगाव ग्रामपंचायत त्याच्या हिश्शाचे पैसे भरण्यास तयार असून, बाकीच्या ग्रामपंचायतीने आपापल्या हिश्श्याचे पैसे भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी पट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी डी.एस. भोसले यांनी केले आहे. वीज वितरण कंपनीचे ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे तेहवीस लाख वीस हजार रुपये एवढे बिल थकलेले असून, यामध्ये ठाणगाव, पाडळी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनNashikनाशिक