शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 19:02 IST

नाशिक- गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशनच्या दुरूस्तीचे काम येत्या शनिवारी (दि.२०) करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ठळक मुद्दे चार विभागात पाणीबाणी रविवारीही कमी दाबाने पुरवठा

नाशिक- गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशनच्या दुरूस्तीचे काम येत्या शनिवारी (दि.२०) करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

गंगापूर धरणाच्या रॉ वाॅटर पंपीग स्टेशनाच्या ठिकाणी असलेल्या महिंद्रा फिडरवरील आऊटगोईंग क्युबिकल येथे केबल किट नादुरुस्त झाल्यामुळे याठिकाणी मिटरींग क्युबिकल केबलची जोडणी करुन टेस्टिंग करण्यात येणर आहे. या कामासाठी शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत वीज पुरवठा खंडीत ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथील रॉ वॉटर पंपींग होणार नसल्याने शनिवारी दूपारी व सायंकाळी पंचवटी, नाशिकरोड, सातपूर व पश्चिम विभागात पाणी पुरवठा बंद राहील. त्याच प्रमाणे सिडको विभागात प्रभाग क्रमांक २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र. २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर आणि

पूर्व विभागातील वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्र.क्र. २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ १, २, ३ व ४ प्र.क्र. १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा नगर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर, प्र.क्र. २३ मधील डीजीपी नगर (भागश:) कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी भागातही शनिवारी (दि. २०) दूपारी व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी (दि.२१) सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, असे महापालिकेने कळवले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी