चांदवडकरांना घरपोच पाणीपुरवठा
By Admin | Updated: April 6, 2017 00:43 IST2017-04-06T00:43:06+5:302017-04-06T00:43:33+5:30
चांदवड : येथे घरपोच शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.

चांदवडकरांना घरपोच पाणीपुरवठा
चांदवड : येथे घरपोच शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.
शहरासाठी राज्य शासनाने ६४ कोटींची महत्त्वाकांक्षी पाणीयोजना दिली. ही योजना येत्या १५ महिन्यांत पूर्ण होईल. तोपर्यंत स्वच्छ पाणी मिळावे या भावनेतून आज चांदवड नगरपरिषद व प्रथमेश एंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जलतृप्ती
योजनेचा शुभारंभ करीत असल्याचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी चांदवड नगरपरिषदेने आयोजित केलेल्या जलतृप्ती योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केले.
नागरिकांनी योजनांसाठी तसेच थकबाकी भरून सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरीश जैन, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील शेलार, उपनगराध्यक्ष कविता उगले, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, शिवसेना गटनेते व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कॉँग्रेस गटनेते व नगरसेवक रवींद्र अहिरे, अॅड. नवनाथ अहेर, अशपाक खान, अल्ताफ
शेख, बाळू वाघ, राजकुमार संकलेचा, रेखा गवळी, इंदूबाई वाघ, जयश्री हांडगे, पार्वताबाई पारवे, अर्चना पूरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय शेळके, सोनुपंत ठाकरे, कांतीलाल बाफना, संदीप उगले, सोनुपंत ठाकरे, कांतीलाल बाफना, बाळासाहेब वाघ, ज्ञानेश्वर भालेराव आदि उपस्थित होते. यावेळी प्रथमेशचे संचालक हरीश जैन, अन्वर शहा, सुनील शेलार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जगन्नाथ राऊत यांनी केले. (वार्ताहर)
कार्यक्रमास गोविंद कर्डिले, वर्धमान पांडे, अन्वर शहा, शरद बोऱ्हाडे, प्रीतम कटारिया, सुरेश जाधव, सुरेखा बिल्लाडे, परवेज पठाण, संग्राम बच्छाव, वर्धमान आबड, अनिल कोतवाल, रवींद्र गवळी, गणेश पारवे, रवि
बडोदे, बाळा पाडवी, अरुण बिरारी आदिंसह नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)