थत्तेनगरात जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावर
By Admin | Updated: August 26, 2016 23:45 IST2016-08-26T23:45:02+5:302016-08-26T23:45:17+5:30
थत्तेनगरात जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावर

थत्तेनगरात जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावर
नाशिक : गंगापूररोडवरील थत्तेनगर परिसरात महापालिकेची जलवाहिनी फुटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी रस्त्यावर वाहत असून महापालिका कोणतीही दखल घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गंगापूररोडवर थत्तेनगरकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेली ही पाइपलाइन फुटल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळी या भागात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर गळती सुरू होते आणि पाणी रस्त्यावर तसेच दुकानांपर्यंत वाहत जाते. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर एक दोन कर्मचाऱ्यांनी येऊन गळती बंद केल्यासारखे काही तरी केले, परंतु अद्याप गळती बंद झालेली नसल्याचे येथील प्रवीण अहिरराव यांनी सांगितले. धरणात भरपूर साठा असल्याने पाण्याची उधळपट्टी सुरू आहे का, असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत.