शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

शहरात पाणीकपातीचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:00 IST

हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले

नाशिक : हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले असून, या संदर्भात महापालिका, जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यात अंतिम निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कुंटे हे नाशिक जिल्हा दौºयावर आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या गांभीर्यावर भाष्य केले. नाशिक शहराची वाढती लोकसंख्या व त्यासाठी लागणारे पाण्याचा विचार करता, गंगापूर धरणातून शहरासाठी ४९०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आॅक्टोबर ते मे महिन्यापर्यंत महापालिकेने ३४४० दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचा वापर केला आहे. शहरासाठी महापालिका दररोज १६.१८ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा धरणातून करीत आहे.उन्हाळ्यात पाणी उचलण्याचे हे प्रमाण पाहता, महापालिकेने जुलैअखेरपर्यंत केलेल्या नियोजनानुसार हे योग्य असले तरी, उन्हाच्या तडाख्याने धरणातील पाण्याचे वाढते बाष्पीभवनाचे प्रमाण व त्यातच यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचे हवामान खात्याने दिलेले संकेत पाहता, जून, जुलै महिन्यांत पाऊस पडला नाही तर ऐनवेळी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धावपळ करण्याची वेळ येवू शकते.कठोर भूमिका घ्यावी लागणारमहापालिकेसाठी आरक्षित असलेले पाणी व जुलैअखेरपर्यंत लागणारे पाण्याचा विचार करता, शहरात पाणीकपात करण्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून धोरण ठरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे शहरातही पाणी जपून वापरावे लागणार असून, शहरातील काही भागांत पाण्याचा होणाºया अपव्ययाबाबत महापालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.सध्या गंगापूर धरणात २५ टक्के, तर धरण समूहात १६ टक्के पाणी शिल्लक असल्याची बाब पाटबंधारे खात्याने पालक सचिव सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून देतानाच महापालिकेला पाणीकपातीचा सल्ला देण्याची विनंती केली. त्याचा आधार घेत कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज बोलून दाखविली.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक