शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विहिरीचे पाणी आटल्याने राजापूरमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:45 IST

राजापूर : येवला तालुक्यातील लोहशिंगवे शिवारातून राजापूर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो, मात्र तेथील विहिरीचे पाणी आटू लागल्याने गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून नागरिक त्रस्त

राजापूर : येवला तालुक्यातील लोहशिंगवे शिवारातून राजापूर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो, मात्र तेथील विहिरीचे पाणी आटू लागल्याने गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.यापूर्वी दर तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा सुरू होता. गाव व परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी कुठे मिळेल का विचारत महिला व पुरुष मंडळी फिरत आहेत. गावाची पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कुचकामी ठरली आहे. आतापर्यंत लाखो रुपये पाणीपुरवठा योजनेवर खर्च झालेला आहे. मात्र ठोस असे कुठेही पाहिजे त्या प्रमाणात उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे मात्र यश येत नाही. सत्ता कोणत्याही गटाची असो उन्हाळ्यात पाण्याची वणवण असतेच, त्यामुळे महिला व ग्रामस्थ नाराज आहेत. राजापूर गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना व मुबलक पाणी उन्हाळ्यात कधी मिळणार, असे प्रश्नचिन्ह महिलांसमोर उभे आहे.राजापूरसाठी येथील दोन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने येथील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वडपाटी पाझर तलावाजवळील असलेल्या विहिरीचे पाणी कमी झाले असून आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागणार आहे.उन्हाळ्यात पाणीटंचाई ही राजापूरवासीयांना पाचवीला पूजलेली समस्या आहे. आतापर्यंत राजापूर येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या, मात्र त्या कुचकामी ठरत आहेत. लोहशिगवे येथील विहिरीचे पाणी आटले असल्याने आता फक्त वडपाटी येथील पाणीपुरवठा सुरू राहणार असून तेथील विहिरीला पाणी कमी पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने तालुक्यातील सर्वात उंचावर असल्यामुळे तेथे कोणत्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. राजापूर येथील दोन पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत आहेत. लोहशिगवे येथील पाणी योजना फक्त आठमाही चालत असल्याने पुन्हा उन्हाळ्याचे चार महिने ही पाणीपुरवठा योजना बंद असते. वडपाटी येथील विहिरीचे पाणी पाहिजे तसे येत नसल्याने राजापूर हे गाव मोठे असल्याने दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती सरपंच नलिनी मुंढे, उपसरपंच सुभाष वाघ यांनी दिली.गावाचा सगळा भार हा वडपाटी येथील पाणीपुरवठा योजनेवर आला असल्याने गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. शासन दरबारी राजापूर हे गाव टँकरमुक्त झाले आहे. परंतु निसर्गाच्या भरवशावर येथील सगळे जीवनमान अवलंबून आहे. दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी जानेवारीपासून येथील विहिरी तळ गाठतात. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.लोहशिंगवे व वडपाटी अशा दोन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून गेल्या आठ दिवसांपासून एकही पाणीपुरवठा सुरू नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. गावातील व वाड्यावस्त्यावरील रहिवाशांना पाणी बचत करून पाणी वापरावे लागते आहे. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करावी, अशी मागणी महिला करीत आहेत.राजापूर हे गाव टँकरमुक्त झाले असल्याने वडपाटी व लोहशिंगवे या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून या दोन्ही एकाच वेळी बंद पडल्या असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वडपाटी येथील विहिरीचे पाणी कमी पडले असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावांसाठी पाणी साठवून गावाला आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे.राजापूर व परिसरातील वाड्यावस्त्यांवरील रहिवाशांनी विकत टँकरने पाणी घेऊन आपल्या कुटुंबाची व मुक्या जनावरांची तहान भागवली जात आहे. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनांकडे लक्ष देऊन गावाला पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.राजापूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या लोहशिंगवे शिवारातील विहिरीचे पाणी आटल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. वडपाटी पाणीपुरवठा योजनेवर संपूर्ण गावाचा भार आला आहे व वडपाटी पाणीपुरवठा विहिरीला पाणी कमी प्रमाणात येत असल्याने त्यामुळे आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जाणार आहे.- आर. एस. मंडलिक, ग्रामसेवक, राजापूरआतापर्यंत राजापूर गावाला पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत. उन्हाळ्यात चार महिने हे राजापूर गाव व वाड्यावस्त्यांवरील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना हा दरवर्षी करावाच लागतो. अनेक शेतकऱ्यांना पशुसंवर्धन हे पाणीटंचाईमुळे करता येत नाही. पाणीटंचाईची समस्या नागरिकांच्या पाचवीला पुजलेली आहे.- प्रवीण वाघ, रहिवासी, राजापूर 

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत