बागलाण तालुक्यात पाणीटंचाई
By Admin | Updated: July 5, 2014 00:26 IST2014-07-04T22:09:04+5:302014-07-05T00:26:57+5:30
बागलाण तालुक्यात पाणीटंचाई

बागलाण तालुक्यात पाणीटंचाई
सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतीसिंंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, तालुक्यातील दोघा धरणांबरोबरच पाचही लघुपाटबंधारे प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत, तर दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने भीषणावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. १९ गावांना सुरू असलेले टँकरची मागणी अधिक तीव्रतेने वाढलेली आहे. संभाव्य टंचाई परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलेले आहे.
बागलाण तालुक्यात जून महिना पूर्णत: कोरडाच गेलेला आहे. १ जून ते ३ जुलैपर्यंत अवघा ८.९० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे, तर गत वर्षी याच एक महिन्याच्या कालावधीत सुमारे २०३ मि.मी. इतका पाऊस झाला होता. यामुळे यंदाची पावसाची सरासरी बघता पाऊसच झालेला नाही.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने आता जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. गत वर्षीदेखील बागलाण तालुक्यात अत्यल्प पावसाची नोंद झाल्याने तालुक्यातील विहिरी, नदी, नाले पूर्णत: आटले आहेत. परिणामी तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. सद्यस्थितीत बागलाण तालुक्यात १९ गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत.
बागलाण तालुक्यातील शेतीसिंचनासाठी उभारण्यात आलेल्या केळझर (५७२) व हरणबारी (११६६) या दोन धरणांतील जलसाठा तर पूर्णत: संपुष्टात आलेला आहे. दोघेही धरणे कोरडीठाक झालेली आहेत, तर पठावे दिगर, दसाने, जाखोड, शेमळी, तळवाडे भामेर या पाचही लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाण्याची पातळीदेखील संपुष्टात आलेली आहे. यामुळे शेतीसिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीसिंचनासाठी उभारलेले हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येत असताना त्यांच्यातील जलसाठा संपुष्टात आल्याने शेतकरीवर्गासह सर्वसामान्य जनता आवासून आकाशाकडे बघू लागली आहे.
पठावे लपा तलाव गिरणा खोऱ्यात असून हत्ती नदीवर असून, या तलावाचा लाभ १२ कि.मी. परिसराला होतो. दसाने लपा तलाव गिरणा खोऱ्यातील कान्हेरी नदीवर असून, त्याचे पाणलोट क्षेत्र २२.२७ चौ.मी. इतके आहे. जाखोड लपा तलाव करंजाडी खोऱ्यातील कान्हेरी नदीवर असून, १२.१७ कि.मी. पाणलोट क्षेत्र फळ आहे, तर शेमळी तलाव गिरणा खोऱ्यात असून, कान्हेरी नदीवरील ८.५० कि.मी. पाणलोट क्षेत्रफ ळ आहे. तळवाडे भामेर गिरणा खोरे अवळाई १९.६८ पाणलोट क्षेत्र आहे. (वार्ताहर)
या पाचही लघुपाटबंधारे तलाव परिस्थितीदेखील वेगळी नाही.