शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:12 IST

सायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : विहिरी, बोअरवेल्सवर लाखोंचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेती व्यवसाय विशेषत: निसर्गावरच अवलंबून आहे. पर्यायी पाटपाण्याची सुविधा नसल्याने या भागातील रब्बी हंगामातील पिकांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शेतकरी खरीप हंगामातील मिळालेली मिळकत व कर्जावू घेतलेला पैसा रब्बीचे पिके वाचविण्यासाठी विहिरी व बोअरवेल खोदण्याचा केविलवाणा प्रयत्न वर्षानुवर्ष करत आला आहे.साठ फूट खोलीची विहीर खोदून बांधायची म्हटल्यावर चार ते पाच लाखांचा खर्च येतो. सरासरी दोनशे फूट बोअरवेल्स घ्यायचा तर १५ हजार रुपये लागतात. पर्यायी पाट पाण्याची सुविधा नसलेल्या उत्तर-पूर्व भागातून दरवर्षीकोट्यवधी रुपये खर्च होताना दिसतात. त्यात शंभरात एखाद्या विहिरीला अथवा बोअरला पाणी लागते, तेही दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर-पूर्व भागातील सुमारे ६० खेड्यांतून दरवर्षी ३०० विहिरी नव्याने खोदल्या जातात तर हजारो बोअरवेल्स घेतले जातात.कोट्यवधींचा जुगारतालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४३८ मिलिमीटर इतके आहे. यंदाच्या हंगामात विक्र मी पर्जन्य होऊनही उत्तर - पूर्व भागाला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी विहिरी, बोअरवेल्स वाढतच आहे. मात्र रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र वाढताना दिसत नाही. याचा अर्थ पाण्याच्या शोधार्थ नाशिबावर हवाला ठेवून शेतकरी दरवर्षी कोट्यवधीचा जुगारच खेळतो आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात