शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 10:44 PM

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

ठळक मुद्देआदिवासींची व्यथा : पावसाच्या माहेरघरीत पाण्यासाठी वणवण

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा परिसरात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत.कवी कुसुमाग्रज यांनी दत्तक घेतलेलं हे गाव. गावाला सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे. गावातील लोक भक्तिभावाने विठ्ठलाची आराधना करतात व येथे दरवर्षी साप्ताहाचे आयोजन केले जाते. निसर्गाने भरभरून दिलेल्या गावाला आज पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे.त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशगावातील विहिरींनी तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी चार-पाच किमी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.मोठी पराकाष्ठा करून गावात टँकर मंजूर झाला झाला. आंबोली धरणातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणानेही तळ गाठल्याने दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला, पुरुषांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. महिलांचा संपूर्ण दिवस पाण्यासाठी वणवण करण्यात जात आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची दाहकता जाणवत असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. गणेशगाव वाघेरा येथील नागरिकांनी परिसरातील पाण्याच्या टंचाईची दाहकता प्रशासनास कळावी याकरिता मागील वर्षी विनायकनगर येथील नागरिकांनी टंचाई व पाण्याची दाहकता या विषयावर शॉर्ट फिल्म तयार केली होती. ती तत्कालीन राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना सुपुर्द केली होती; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली.तालुक्यात एकही मोठे धरण नाहीपावसाचे माहेरघर म्हणून त्र्यंबकेश्वर तालुका ओळखला जातो. जगात कुठेही दुष्काळ पडेल पण आपल्याला त्याची दाहकता जाणवणार नाही अशी गावातील वयस्कर माणसं सांगायची; परंतु मागील काही वर्षांत गणेशगावचा पाणीप्रश्न अधिक तीव्र होत आहे. तालुक्यात चांगला पाऊस पडत असतो; पण तालुक्याचे दुर्दैव आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे तालुक्यात एकही मोठे धरण नाही. अंबोली धरण आहे; परंतु त्या धरणावरून त्र्यंबकेश्वरला २४ तास पाणी पुरवले जाते. त्यामुळे धरणाने तळ गाठला आहेगावात इतका दुष्काळ पडला की अक्षरश: डोळ्यातील अश्रू आटले आहेत. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. गावाने श्रमदान करून विहिरीतील गाळ उपसला; मात्र जल पातळी खालावल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.- रु क्मिणी उदारसरपंच, गणेशगाव (वा.)