गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:44 PM2019-06-06T22:44:59+5:302019-06-06T22:45:36+5:30

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

Water scarcity in Ganeshgarh | गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

Next
ठळक मुद्देआदिवासींची व्यथा : पावसाच्या माहेरघरीत पाण्यासाठी वणवण

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा परिसरात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत.
कवी कुसुमाग्रज यांनी दत्तक घेतलेलं हे गाव. गावाला सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे. गावातील लोक भक्तिभावाने विठ्ठलाची आराधना करतात व येथे दरवर्षी साप्ताहाचे आयोजन केले जाते. निसर्गाने भरभरून दिलेल्या गावाला आज पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे.
त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशगावातील विहिरींनी तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी चार-पाच किमी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.
मोठी पराकाष्ठा करून गावात टँकर मंजूर झाला झाला. आंबोली धरणातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणानेही तळ गाठल्याने दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला, पुरुषांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. महिलांचा संपूर्ण दिवस पाण्यासाठी वणवण करण्यात जात आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची दाहकता जाणवत असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. गणेशगाव वाघेरा येथील नागरिकांनी परिसरातील पाण्याच्या टंचाईची दाहकता प्रशासनास कळावी याकरिता मागील वर्षी विनायकनगर येथील नागरिकांनी टंचाई व पाण्याची दाहकता या विषयावर शॉर्ट फिल्म तयार केली होती. ती तत्कालीन राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना सुपुर्द केली होती; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली.तालुक्यात एकही मोठे धरण नाहीपावसाचे माहेरघर म्हणून त्र्यंबकेश्वर तालुका ओळखला जातो. जगात कुठेही दुष्काळ पडेल पण आपल्याला त्याची दाहकता जाणवणार नाही अशी गावातील वयस्कर माणसं सांगायची; परंतु मागील काही वर्षांत गणेशगावचा पाणीप्रश्न अधिक तीव्र होत आहे. तालुक्यात चांगला पाऊस पडत असतो; पण तालुक्याचे दुर्दैव आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे तालुक्यात एकही मोठे धरण नाही. अंबोली धरण आहे; परंतु त्या धरणावरून त्र्यंबकेश्वरला २४ तास पाणी पुरवले जाते. त्यामुळे धरणाने तळ गाठला आहेगावात इतका दुष्काळ पडला की अक्षरश: डोळ्यातील अश्रू आटले आहेत. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. गावाने श्रमदान करून विहिरीतील गाळ उपसला; मात्र जल पातळी खालावल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
- रु क्मिणी उदार
सरपंच, गणेशगाव (वा.)

Web Title: Water scarcity in Ganeshgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.