शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:30 IST

कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाणीयोजना अपूर्णावस्थेत । टॅँकरसाठी दोन प्रस्ताव दाखल

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वीच बरड्याच्या वाडीच्या रूपाने पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. सध्या या वाडीचा पाणीटंचाईचा पूर्ण तूर्तास सुटला असताना आता तालुक्यातील वेळे आणि विनायक नगरमध्ये टॅँकर सुरू करण्याचे प्रस्ताव त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये येऊन धडकले आहेत. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असे वाटत असतानाच पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एकूण दहा कामे मंजूर झाली असून, त्यापैकी चार कामांच्याच निविदा निघाल्या होत्या, पण ठेकेदारांचा हलगर्जीपणा व यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे सुरू असलेली कामे अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. या कामांपैकी रायते व मुलवड येथील कामाची मुदत १ नोव्हेंबर २०१९ रोजी व मुलवड येथील कामाची मुदत १ जानेवारी २०२० रोजी संपली असूनही काम नेहमीप्रमाणे काम प्रगतीत असल्याचे सांगितले जात आहे. खैराईपाली व अंजनेरी येथील कामाची मुदत ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत आहे. सहा मंजूर कामे कोरोनाच्या व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सध्या शासनानेच थांबविलेली आहेत. नव्याने आता एकही काम प्रस्तावित नाही. मंजुरीच्या प्रतीक्षेतील कामे पूर्ण झाली तरच तालुका टंचाईमुक्त होणार आहे.सोमनाथनगर, मेटघर किल्ला, बरड्याच्या वाडीचा प्रस्ताव तर अगोदरच दाखल झाला होता. सध्या ३० एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात पाणी- पुरवठा सुरळीत चालू असला तरी मे महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठ्याचे संकेत मिळत आहेत. वास्तविक अंबोली धरण आटल्यावर अंबोली धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे. पण नगर परिषदेचेही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी