शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

पाणीटंचाईची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी

By admin | Updated: May 6, 2017 23:16 IST

पाणीटंचाईबाबत लोकप्रतिनिधींंनी केलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल दखल घ्यावी, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर यापुढे टंचाई आराखडा तयार करताना भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सूक्ष्म कृती आराखडा तयार करावा. केवळ मागील पानावरून पुढे चालू असे करू नये असे सांगत पाणीटंचाईबाबत त्र्यंबक तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधींंनी केलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल दखल घ्यावी, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिला.आज त्र्यंबक पंचायत समितीचा सर्व खात्यांचा आढावा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष नयना गावित, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, यतीन पगार, पंचायत समिती सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, जि.प. सदस्य मनीषा पवार, रुपांजली माळेकर-खोसकर, शकुंतला डगळे, रमेश बरफ, पं. स. सदस्य देवराम मौळे, अलका झोले, मनाबाई भस्मे आदी उपस्थित होते. शीतल सांगळे म्हणाल्या, पाणीटंचाईबाबत त्र्यंबक तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या तक्र ारींची दखल प्रशासनाने घ्यावी असे आदेश देऊन त्या म्हणाल्या, त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी दुर्गम असून, उपस्थित अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या त्यांना शासकीय सेवा सवलती देणारे तुम्ही दूत असून, या बांधवांना तुम्ही वंचित ठेऊ नका. सर्व सेविकांचा लाभ द्या. दलित वस्ती सुधार योजनेबद्दल त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या योजनेचा एक चांगला आराखडा तयार करावा. आरोग्य, महिला व बाल संगोपन, शालेय पोषण आहार अंगणवाड्या आदींचाही परामर्श त्यांनी घेऊन या विषयांना अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे. तर सरपंच लोकप्रतिनिधी यांनी मांडलेल्या सूचना शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी निश्चित प्रयत्न करू. आपल्या सूचना लेखी स्वरूपात द्या. आपणास निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.बऱ्याच टंचाईग्रस्त वाड्या पाड्यांवर टँकर देताना, भरलेला टँकर देताना चढावामुळे वर जात नाही, अशी अडचण समोर आली. तर मग अशा वेळेस टंचाईच्या गावांना तुम्ही पाणी कसे देता? असा सवाल उपाध्यक्ष नयना गावित यांनी उपस्थित केला. याबाबत निश्चित असे कोणीच सांगू न शकल्याने नयना गावित यांचा सवाल अनुत्तरित राहिला. टंचाई या विषयावर बराच खल झाला. यामध्ये विनायक माळेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, वाघेरा सरपंच जयराम मोंढे सराई आदींसह जि. प. सदस्य रुपांजली माळेकर यांनी नवीन योजना करताना पाण्याचे जिवंत स्त्रोत शोधून त्याच ठिकाणी विहीर बावडी खोदून योजना तयार करावी अशी सूचना केली. त्यानुसार नवीन योजना तयार करताना याही गोष्टींचा समावेश करावा, असे आदेश अध्यक्षांनी दिले. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता नंदनवरे यांनी भारत निर्माण योजना यापूर्वी स्थानिक समित्यांच्या हातीही देऊन पाहिल्या पण अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला. आढाव्यात मुख्य विषय पाणीटंचाई असला तरी अन्य विषयांचादेखील ऊहापोह करण्यात आला. यावेळी उपमुख्य अधिकारी (ग्रामपंचायत ) राजेंद्र पाटील, ल.पा. पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता, सी. डी. वाघमारे, पशुधन अधिकारी डॉ. प्रशांत फलक, शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे, देवराव म्हस्के या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.