उसवाड जिल्हा परिषद शाळेची जलसाक्षरता दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:58 IST2019-07-15T17:58:31+5:302019-07-15T17:58:55+5:30

उमराणे : जलसाक्षरता दिनानिमीत्त उसवाड (ता. चांदवड) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी जलदिंडी काढून पाणी बचतीचा संदेश दिला.

Water Sanctuary of Iswad Zilla Parishad School Dindi | उसवाड जिल्हा परिषद शाळेची जलसाक्षरता दिंडी

जलसाक्षरता दिनानिमित्त जिल्हा परिषद उसवाड येथील प्राथमिक शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या जलदिंडीत विद्यार्थी व शिक्षक.

ठळक मुद्दे पाण्याचे आपल्या जीवनातील स्थान व त्याचे महत्व विशद केले.

उमराणे : जलसाक्षरता दिनानिमीत्त उसवाड (ता. चांदवड) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी जलदिंडी काढून पाणी बचतीचा संदेश दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन पाणी अडवा-पाणी जिरवा, स्वच्छ पाणी सुंदर परिसर, जीवन होईल निरोगी निरंतर, थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल तुमच्या जीवनी अशा घोषणा देत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. शिक्षक संदीप हिरे यांनी पाण्याचे आपल्या जीवनातील स्थान व त्याचे महत्व विशद केले.
कार्यक्र मास मुख्याध्यापक जिभाऊ कदम श्यामराव चव्हाण, सुनिता भदाणे, संगीता हिरे, सविता भामरे, संदीप हिरे, प्रशांत देवरे, दत्तात्रय चांडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
 

Web Title: Water Sanctuary of Iswad Zilla Parishad School Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.