शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उपसावर नियंत्रण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:47 IST

नाशिकरोड : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या वापरासाठी होणाऱ्या अनिर्बंध पाण्याच्या उपसावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकानेच पाणी बचतीसाठी जनजागृती करावी, तसेच अमंलबजावणी करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ च्या मसुदा नियमांचा बारकाईने अभ्यास करून संबंधितांनी आपले मत किंवा सूचना ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले आहे.

ठळक मुद्देराजाराम माने : भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणा कार्यशाळा

नाशिकरोड : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या वापरासाठी होणाऱ्या अनिर्बंध पाण्याच्या उपसावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकानेच पाणी बचतीसाठी जनजागृती करावी, तसेच अमंलबजावणी करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ च्या मसुदा नियमांचा बारकाईने अभ्यास करून संबंधितांनी आपले मत किंवा सूचना ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले, दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जलस्वराज्य टप्पा २ चे उपसंचालक चंद्रकांत भोयर, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी उपस्थित होते.सांगळे म्हणाल्या, भूजल संर्वधन करणे ही काळाची गरज आहे. सदरच्या अधिनियमाची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य शेतकºयांचे हित लक्षात घेऊन त्यानुसार अधिनियमात आवश्यक ते बदल करावेत. अधिनियमाच्या मसुद्यातील नियमांमधील जिल्ह्यातील विहिरी, विंधन विहिरींची नोंदणी, पाण्याचे गुणवत्तेबाबत संरक्षण, भूजलाचे कृत्रिमरीत्या पुनर्भरण याबाबत बेडवाल यांनी माहिती दिली.प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी अधिनियमाच्या मसुदा नियमात संबंधितांनी दि. ३१ आॅगस्टपर्यंत आपल्या सूचना किंवा हरकती अपर मुख्य सचिव, मुंबई यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन केले. या कार्यशाळेसाठीजिल््ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, प्रमुख ग्रामस्थ, महत्त्वाचे शेतकरी उपस्थित होते.उपाययोजना करावीमाने म्हणाले, शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या वापरासाठी होणाºया अनिर्बंध पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. पाणी बचतीच्या दृष्टीने इमारतींवर पडणाºया पावसाच्या पाण्यापासून जल पुनर्भरण, औद्योगिकीकरण क्षेत्रातील प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण करणे यासारख्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही माने यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई